Home महाराष्ट्र पुसद शहरात छत्रपती शिवाजी महाराज शिवजंयतीचा चौकात जलोष

पुसद शहरात छत्रपती शिवाजी महाराज शिवजंयतीचा चौकात जलोष

133

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.19फेब्रुवारी):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवाजी चौकात मानाचा मुजरा देण्यासाठी शिवभक्ताचा गर्दीचा जलोष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह पाहण्यासाठी जनतेचा प्रतिसाद ज्यांचे केवळ नाव ऐकून सुद्धा शरीरात प्रचंड ऊर्जेचा संचार होतो,त्यांच्या विचारांचा वारसा हीच खरी आपली संपत्ती आहे.

स्वराज्याच्या छत्रपतींना कोटी कोटी नमन करण्याकरिता माझ्या राजाच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि,12 तारखे पासुन ते18 तारखेपर्यत प्रबोधन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते या शिवपर्व करिता अतीशय परिश्रम घेऊन कुशल नेतृत्व व सर्व जातीधर्माच्या समुहाना सोबत घेऊन शिवपर्व करिता सिहाचा वाटा आणी पुढाकार घेणारे युवा तरूण तडफदार कुशल नेतृत्व असणारे अर्बन बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैन्द यांनी अतीशय योग्य वेळेचे बंधन शिस्तपणा आणी सुव्यस्था शांतताप्रिय कार्य केले.

त्यामुळे पुसद शहर हे शिवपर्व दरवर्षी असेच होईल आणी वार्डा-वार्डात चौका-चौकात जयंतीचा जलोष असणे गरजेचे आहे एवढेच नव्हे तर दरवर्षी पाच ते आठवी वय गटाती स्पर्धा परिक्षाचे उपक्रम राबविला जातो त्या स्पर्धा परिक्षामुळे विध्यार्थाना उर्जा मिळावी आणी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पोहचावे असे शरदभाऊ मैदं यांनी आव्हान देखील केले आहे या बाबत एक महीण्या आधीच आढावा बैठक बोलावुन नियोजन करण्यात येईल असे आश्वासन देतो जयशिवराया जयजिजाऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here