रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.16फेब्रुवारी):-खेरवाडी सोसियल वेलफेअर असोसिएशन द्वारा संचालित ब्रम्हपुरी येथे युवापरिवर्तन कौशल्य विकास संस्थे मार्फत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण अगदी माफक दरात सर्वांना उपलब्ध करून, उत्कृष्ट प्रशिक्षकांच्या माध्यमाने प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. अशातच, दि.15 फेब्रुवारी 2013 रोजी बुधवारला, युवा परिवर्तन संस्थेचा 25 वा “वर्धापन दिन आणि कलागुन सोहळा” मोठ्या उत्साहात आणि थाटामाठात ब्रम्हपुरी येथे साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.युवराज मेश्राम सर, उदघाटक सौ.डॉ.अंजली वाडेकर मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.कळसकर सर, श्री.उदयकुमार पगाडे, श्री.रवींद्र गाठे, श्रीमती.आंबीलडुके मॅडम, श्री.सचिन दिघोरे, श्री.सुभाष चुऱ्हे, इत्यादी पाहुणे प्रामुख्याने उपस्तिथ होते. या कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन आणि थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
ह्या कार्यक्रमात संस्थेमार्फत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेक नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना, मान्यवरांच्या हस्ते डिप्लोमा आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सावन सहारे, तर आभार कुंदा निकुरे यांनी केले. ह्या सुंदरश्या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता वर्षा भानारकर, रमाकांत बगमारे आणि प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.




