सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.15 फेब्रुवारी):- कोवीड काळात आपली आजारीआरोग्य यंत्रणा आपण पाही ली त्याचा उपचार होणे गरजेचे असल्याने शासनाने त्यास सक्षम बनविणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे मेडीकल गायडन्स विभागाचे प्रभारी अब्दुल नईम यांनी मांडले
ते जन सेवार्थ स्थापन करण्यात आलेल्या राहत क्लीनिक च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
जमाते इस्लामी हिंद महाराष्ट् उपक्रमाचे महत्व विषद करून पुढे म्हणाले की आता पर्यंत या व्दारे किडनी ट्रान्सप्लान्ट, बायपास,व्हॉल रिप्लेसमेन्ट, ह्दयातील छिद्र एएसडी, व्हिएसडी, कॅन्सर, ब्रेनट्युमर, पेसमेकर,एन्जोप्लास्टी,स्पाईन , हीप जाईन्ट आदी 22 . 49 कोटी ची 4802 मेजर शस्त्रक्रिया 5,86 लक्ष रूग्गाना मार्ग दर्शन 39080 रुग्णाना आर्थीक मदत करण्यात आल्याचे नईम हे म्हणालेत.
या कार्यक्रमात वैधकिय क्षेत्रात समाज सेवक म्हणून उत्तम कामगीरी करित असलेले औरंगाबाद चे तौसीफ खान , नांदेड चे अब्दुल हकीम, पुसद चे अब्दुल मुदस्सीर, अ . नईम याचा या प्रसंगी संन्मान करण्यात आला.
क्लीनिक मध्ये 20 रुपये तपासणी फी व अत्यअल्प दरात औषधी, आयपीडी आणी रक्त तपासण्याची सवलत, तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट सेवा मिळणार आहेत तसेच वैघकीय मार्गदर्शन केंद्रा व्दारे सरकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
यावेळी मंचावर शेख नईम जिल्हाध्यक्ष जमाते इस्लामी हिंद, इनायतउल्ला खान जनाब, मौ . बदरुल इस्लाम, अँड संतोष जैन, डॉ. राम नाईक,डॉ. उजेर शेख, डॉ . मो गौस, डॉ . जुबेर विराणी, डॉ.शिवकन्या चिंचोलकर, डॉ . सुमेघा राठोड , डॉ प्रदीप शिंद , डॉ फारुक अबरार, डॉ . सलीम शेख, ठाणेदार अमोल माळवे , सुनिल चिंचोलकर जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना , देवानंद मोरे, डेपो मॅनेजर मोहन वाकड़े, एमपीजे तालुक अध्यक्ष हाफीज अन्सार, समद कुरेशी, मजहर टेलर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काझी जहीरोद्दीन यांनी सुत्रसंचलन फिरोज अन्सारी यांनी तर आभार प्रदेशन अजीमउल्ला खान यांनी केले
