रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.14 फेब्रुवारी):-स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे 10 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2023 ला वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 10 फेब्रुवारी 2023 सकाळी 10 वा. वार्षिकोत्सवचा उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रह्मपुरीचे अध्यक्ष प्रा.डॉ. राकेश तलमले, उद्घाटक म्हणून ब्रह्मपुरी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव शरद तलमले, संस्था सदस्य रामकृष्ण तलमले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आर्शिया जुही म्हणाल्या कि, आजची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सुप्त कलागुणांना प्रकट करण्याचे माध्यम म्हणजे वार्षिकोत्सव होय. अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ. राकेश तलमले म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ महाविद्यालयाने निर्माण करून दिलेले आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालक प्रा. जयगोपाल चोले यांनी केले तर आभार संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डिंपल तलमले यांनी मानले.
वार्षिकोत्सव 2023 मध्ये रांगोळी स्पर्धा, व्यंजन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, गीत गायन स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, स्वयंस्पूर्त भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा घेण्यात आली होती. या दोन दिवशीय वार्षिकोत्सव अनेक स्पर्धा घेण्यात आल्या आणि या स्पर्धांमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. 11 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता बक्षीस वितरण सोहरा पार पाडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरीचे माजी प्राचार्य डॉ. एन.एस. कोकोडे तर प्रमुख अतिथी प्रा.डॉ.राकेश तलमले, प्रा. मंगेश देवढगले, रामकृष्ण तलमले, लीना रामटेके, अजय डोये उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.एस. कोकोडे म्हणाले की, गरीब परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात रंग भरावे. गरीबी ही मानवाला मोठे बनवायला शिकवते. प्रा.डॉ.राकेश तलमले म्हणाले की, डॉ. कोकोडे सरांनी गरिबीतून इथपर्यंत शिखर गाठल आहे.
त्यांचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण करावे आणि आयुष्यात मोठे व्हावे. प्रा. मंगेश देवढगले म्हणाले की, अपयश हि यशाची पहिली पायरी आहे. म्हणून अपयशाला कुणीही घाबरू नये तर त्यांना हिमतीने समोरे जावे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लालाजी मैंद यांनी केले तर संचालन प्रा. संतोष पिलारे यांनी केले तर आभार प्रा.जयगोपाल चोले यांनी मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते




