बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.14फेब्रुवारी):-जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय सेवेचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आज (दि.१३ फेब्रुवारी) रोजी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास अंगणवाडी कर्मचारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा तसेच कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन अत्यंत तुटपुंजे असून त्यामध्ये वाढ करण्यात यावे.
यासह इतर मागण्यासाठी आज संघटनेच्या वतीने आज (दि,१३ फेब्रुवारी) रोजी बीड जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला सदरील हा मोर्चा प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, दत्ता देशमुख, कमल बांगर, सचिन आंधळे, यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांसह कर्मचारी सहभागी झाले होते यापूर्वीही अनेक वेळा कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. मात्र याची तितकी दखल शासनाने घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत राहिले तर 20 फेब्रुवारीपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे




