अध्यक्षपदी हगवणे तर सचिवपदी इंगळे बिनविरोध
बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.31जानेवारी):-येथील दिनांक 29/1/2023 ला विदर्भ पटवारी संघ नागपुर उपविभाग शाखा पुसद ची वार्षिक आमसभा मा.श्री. एन.आर.हगवने साहेब यांच्या अध्यक्षतेखालील व मा. श्री.राजुभाऊ मानकर साहेब अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपुर जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जील्हा उपाध्यक्ष श्री.संजयजी मारकंड साहेब, सहसचिव मा.श्री.श्रीकांत तलवारे साहेब तसेच दारव्हा उपविभागाचे अध्यक्ष मा.श्री.एस.सी.भगत साहेब उपस्थित आजी माजी पदाधिकारी यांचे उपस्थितीत पुसद येथे संपन्न झाली.
यामध्ये खालील प्रमाणे कार्यकारणीची अविरोध निवड करण्यात आली. सचिव पदी आर. बी, इंगळे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदी श्री.एन. आर. हगवने उपाध्यक्ष-श्री. मनोज कोरडे सचिव -श्री.आर .बी. इंगळे सहसचिव- श्री. सुमेध खंडारे कोषाध्यक्ष- श्री. निलांजन वानखेडे व सर्कल निहाय सर्कल सदस्य यांची अविरोध निवड करण्यात आली.
सर्व सन्माननीय नवनियुक्त पदाधिकारी व नवनियुक्त सर्कल मेंबर यांचे विदर्भ पटवारी संघ नागपुर जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील संघटनात्मक कार्यास व वाटचालीस खुप खुप शुभेच्छाचा वर्षाव होत आहे
