सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.21जानेवारी):- म्हसवड नगरपालिका हद्दीतील दिव्याग बांधवांना आपले भविष्य उज्वल करण्यासाठी व स्वकर्तृत्वावर आपले जीवन सफल करता यावे यासाठी नगरपालिकेने शासकीय योजनांचा लाभ द्यावा त्यासाठी तरतूद करणेत यावी या मागणीसाठी प्रहार दिव्याग क्रांती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांना निवेदन देणेत आले.
यावेळी प्रहार दीव्यांग क्रांती संघटनेचे मान तालुका अध्यक्ष नागेश खांडेकर म्हणाले दीव्यांग बांधव म्हसवड नगरपालिकेच्या सर्व बाबींपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५ % रक्कम म्हसवड हद्दीतील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींच्या खात्यावरती वर्ग करणे, येथील दिव्यांगाना विना अट घरकुल देण्यात यावे, ज्या दिव्यांग बांधवांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थींना नगरपालिकेची जागा किंवा जागा घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, दिव्यांगाना स्टॉल टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, दिव्यांगांच्या साठी कार्यक्रम घेण्यासाठी मोफत हॉल उपलब्ध करून देणे, ज्या दिव्यांग बंधू भगिनी आठवडी बाजारामध्ये आपल्या शेतातील किंवा तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी बाजारात बसतात त्यांची पावती माफ करणे, जे दिव्यांग खेळाडू जिल्हा पातळीवर, राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळवतात त्यांना प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करणे, दिव्यांगांच्या सर्व प्रकारच्या अर्जांचे निवारण नगरपालिका कार्यालयाच्या तळमजल्यावर करण्यात यावे.घरपट्टी करामध्ये मध्ये 50 टक्के, नगरपालिका सर्व कार्यालयांना रॅम्पची सोय करण्यात यावी.
या मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व म्हसवड दिव्यांग बांधवांच्या वतीने म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी मा. डॉ. सचिन माने साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार एल के सरतापे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे माण तालुका अध्यक्ष नागेश खांडेकर सर, दिव्यांग दूत प्रशांत ढवण, बाळू कोळेकर, संजय विरकर, मच्छिंद्र खाडे, अमोल सादिगले, सचिन गलांडे, जाधव सर, अजित माने, आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.




