सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.21जानेवारी):-माण तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने माण तालुक्यातील सर्व दिव्यांग (अपंग), अनाथ, विधवा महिला, निराधार बंधू भगिनी यांची पेन्शन वाढ करणेसंदर्भात, सेतू तसेच सर्व शासकीय कार्यालयांमधील दाखले मोफत मिळणे, वरील घटकातील सर्वांना विभक्त शिधापत्रिका मिळून सर्वांना अंत्योदय योजनेतील 35 किलो धान्य मिळणे, पंतप्रधान घरकुल आवास योजनेमध्ये सर्वांना विनाअट घरकुल योजना देण्यात यावी.
त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 च्या कायद्याची तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणी करणे, दिव्यांगाना कार्यालयांमध्ये जाण्यासाठी पायरीवरती रॅम्पची व्यवस्था करणे तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या इतर मागण्यां संदर्भात माण तालुक्याचे आदर्श तहसीलदार मा. श्रीशैल वट्टे साहेब याना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष मा. लक्ष्मण हुलगे, दिव्यांग दूत बाबासो कोळेकर, दिव्यांग दूत ज्ञानेश्वर करचे, व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.




