चिमूर येथून होणार प्रकाशित
सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.18जानेवारी):-चिमूर क्रांती नगरीतून नव्यानेच पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करणारे “साप्ताहिक लोक प्रतिष्ठा” या वृत्तपत्राचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२३ रोजी रविवारला आदर्श विद्यालय (बी पी एड कॉलेज) चिमूर येथे सकाळी ११:३० वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड ज्ञानेश्वर नागदेवते राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाकरीता चिमूर तालुका प्रेस असोशीयशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, साप्ताहिक पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे, शिवसेना चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, व्हॉईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष रामदास हेमके, पत्रकार राजू रामटेके, आदर्श विद्यालयचे मुख्याध्यापक नैताम सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,
साप्ताहिक लोकप्रतिष्ठा वृत्तपत्राच्या लोकार्पण सोहळा करीता वाचक, हितचिंतक यांनी जास्तीत जास्त संख्येने उस्थित राहावे असे आवाहन साप्ताहिक लोकप्रतिष्ठाचे संपादक रामकुमार चीचपाले यांनी केले आहे.




