Home महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त विविध ठिकाणी अनेक उपक्रम-चिमूर पोलिस विभागाचे आयोजन

महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त विविध ठिकाणी अनेक उपक्रम-चिमूर पोलिस विभागाचे आयोजन

191

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.14 जानेवारी):- दिनांक 02 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमीत्य चिमुर पोलीसांनी विविध ठिकाणी जनजागृती केली होती. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 4जानेवारी रोजी पुरुषोत्तमदास बागला कान्व्हेंट चिमुर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करुन सायबर फ्रॉड व वाहतुक नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ईयत्ता 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चिमुर येथे भेटी करीता आमंत्रित करुन पोलीस स्टेशनचे कामकाज, CCTNS प्रणाली, शस्त्रे व दारुगोळा इत्यादीची सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पुरुषोत्तमदास बागला कान्व्हेंट चिमुर येथे “महाराष्ट्र पोलीस” या विषयावर निबंध तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सदर स्पर्धेमध्ये इयत्ता 5 ते 7 वी मध्ये शिक्षण घेणारे 103 व इयत्ता 8 ते 9 वी मध्ये शिक्षण घेणारे 60 असे एकुण 163 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस निरीक्षक मनोज गभने, पोलीस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते, पोलीस नाईक कैलास आलाम व महिला पोलीस अंमलदार महानंदा आंधळे यांचे हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले. सदर बक्षिण ‍वितरण कार्यक्रमाकरीता पुरुषोत्तमदास बागला कान्व्हेंट चिमुरच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिरा पेंडके, उपमुख्याध्यापिका सुनिता जोशी, इतर सर्व शिक्षक तसेच 650 विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here