Home महाराष्ट्र सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या समोर अमरण उपोषण...

सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या समोर अमरण उपोषण बसणार

129

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13जानेवारी):- तालुक्यातील मौजे पोखर्णी(वा.)येथील ग्रामपंचायतचे 14 व 15 व्या वित्त आयोगाची कागदोपत्री बोगस कामे दाखवुन सरपंच, ग्रामसेवक यानी बील उचलले असुन त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दि.24 जानेवारी पासून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या समोर अमरण उपोषण करत आसल्याचे म्हटले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि मौ.पोखर्णी (वा.)येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी दोघांनी मिळून 14 व15 व्या वित्त आयोगाची एकही काम न करता अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरुन गावामधिल एकही काम न करता बिल उचलुन खाल्ले आहे. 14 व 15 व्या वित्त आयोगाची झालेल्या बोगस कामाची पाहणी करून व सरपंच ग्रामसेवक यांची चौकशी करुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.अन्यथा दि.24 जानेवारी 2023 रोजी जोपर्यंत सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालय समोर अमरण उपोषण करत आसल्याचे म्हटले आहे.या निवेदनावर शाम गौतम पंडित यांच्या स्वाक्षरी देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here