नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागभीड( दि.12 जानेवारी): – कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथे दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता,राजमाता माँ.जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास चिलबुले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा अमोल रेवस्कर हे होते.याप्रसंगी मंचावर विद्यालयाचे पर्यवेक्षक युवराज इडपाचे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख जगदीश्वर मुंनघाटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अमोल रेवस्कर यांनी माँ जिजाऊ आणी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांसमोर विषद केली.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास चिलबुले यांनी माँ जिजाऊ आणी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील त्यांनी केलेल्या कार्याचे विविध दाखले देत त्यांच्या सारखे कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडो व भविष्यात संस्कारमय पिढी निर्माण व्हावी, आपले राष्ट्र बलवान व्हावे,असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका पर्यवेक्षक युवराज इडपाचे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मांडली,तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा स्वप्नील नवघडे यांनी केले.मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार प्रा गुरुदेव पिसे यांनी मानले व कार्यक्रमाचा समारोप केला.कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.




