रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.5जानेवारी):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाची जननी होती स्त्री-पुरूषांमधील असमानतेच्या विचारांना उखळून फेकण्याचे धारिष्टय दाखवित स्त्रियांना शिक्षणाची दारे मोकळी करून देणा-या फुले दाम्पत्यांचे या देशावर, समाजारावर विशेषतः तमाम स्त्रीवर्गावर अनंत उपकार आहेत. या उपकाराची फेड करण्यासाठी महिलांनी पुरोगामी विचारांचा वारसा अंगीकारीत विविध क्षेत्रात पदार्पण करून आपल्या उन्नतीकरिता स्वाभिमानी बनण्याच्या वाटा प्रशस्त कराव्यात तसेच ‘शिकाल तर वाचाल, शिकाल तर जगाल’ असे प्रतिपादन डाॅ. उज्वला सहारे यांनी आपल्या मौलीक मार्गदर्शनातुन केले.
समस्त सक्षमीकरण बहुउद्देशिय विकास संस्थेच्या माध्यमातून नवेगांव, गडचिरोली येथे दि. 3 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीच्या पर्वावर विविध क्षेत्रातील प्रतिथयश महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रामास प्रमुख पाहुण्या म्हणून डाॅ. सहारे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, स्त्री हिच मुलांचे भवितव्य घडविणारी निर्मिक आहे सावित्रीबाईंच्या कर्तृत्व आणि धीरोदात्तपणाचा आदर्श घेवून सावित्रीच्या प्रत्येक लेकीने आपल्या कर्तव्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच क्रांतीज्योतीच्या स्मरणाला अर्थ उरेल असेही त्यांनी संबोधनातून स्पष्ट केले.
विशेष अतिथी डाॅ. विद्या बांबोळे यांनी आयोजक संस्थेच्या समाजाभिमुख कार्याची प्रशंसा करून या आयोजनात सर्वक्षेत्रातील कर्तबगार स्त्रीयांना एकाच व्यासपीठावर आणत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उपस्थितांना परिचय करून दिला. त्यांच्या वैचारिक उद्बोधणाचा समाजातील महिलांना लाभ मिळेल, नवविचारातून अनेकांना प्रेरणा मिळेल हा उद्देश ठेवून क्रांतीज्योती जयंतीउत्सवप्रसंगी महिलांना आई सावित्रीच्या कार्याचा परिचय देण्याचे कार्य पार पाडले हे प्रशंसनिय असल्याचे त्या म्हणाल्या. ‘प्रवाहाच्या विरूध्द दिशेला तेच पोहु शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतांत’, ‘नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यावर उतरविणे हाच खरा संघर्ष आहे’ ज्योतीबा फुलेंच्या या क्रांतीकारी प्रेरणादायी विचारांची आठवण त्यांनी याप्रसंगी उपस्थित महिलांना करून दिली.
संस्थेच्या अध्यक्षा भावना लाकडे यांनी महिला इंजिनिअर, अॅडव्होकेट, डाॅक्टर, सामाजिक, राजकीय कार्यकत्यांना एकत्रित आणत सावित्रीच्या स्त्रीभिमुख विचारांचा वारसा उपस्थितांपूढे मांडण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले. नवविचारांना अंगीकारणे सोपे असू शकते परंतू ते विचार सत्यात उतरविणे सहजसोपे नसल्याने संघर्षाशिवाय तरणोपार नाही असेही डाॅ. बांबोळे मॅडम म्हणाल्या.
याप्रसंगी समुपदेशक चित्रलेखा वाकुडे यांनी वाढत्या व्यसनाधिनतेवर चिंता व्यक्त करीत स्त्रीयांनी सावित्रीची लेक बनून व्यसनाविरूध्द एल्गार पुकारावा असे अवाहन केले. इंजि. तेजस्वीनी सांगोडे, संस्थापक, गुरूकुल काॅनव्हेंट, कोटगल, ललीता करांबे, अध्यक्षा, नवेगांव बौध्द विहार, शोभाताई खोब्रागडे, ग्रा.पं.सदस्या, नवेगांव, विभा उमरे आदींनी क्रांतीसूर्य ज्योतिबा व माता सावित्रीबाईंच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत महिलांना स्वाभीमान शिकविणा-या सावित्रीबाईंचे विचार सदैव त्रिकालबाधीत राहतील असे विचार मांडले,
या कार्यक्रमास महिलांची उत्सफुर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रविणा लाडवे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थाध्यक्षा अॅड. भावना लाकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेयश सयाम, शालुताई मुनघाटे, राजेश्वरी सहारे, अल्काताई बोरकर, शितल आव्हाड, मयुरी अंधारे यांनी विशेष परिश्र्रम घेतले.




