ब्रह्मपुरी :- सावित्रीबाई फुले विद्यालयाची विद्यार्थीनी कु. सानिया संतोष मेश्राम हिला शालांत परीक्षेत 94% मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकवीत यश प्राप्त केले. द्वितीय क्रमांक कु. संपदा कैलास मेश्राम हिला 82.60, तृतीय क्रमांक कु. सुहाणी सत्यपाल शेंडे हिला 75.20 गुण मिळविले. कु. बबली अनिल करकाडे हिला 73.80,कु. ख़ुशी खुशाल शेंडे हिला 71.81, कुमार शंतनू देवानंद रामटेके याला 69, कुमार नैतिक रेवनाथ राऊत याला 68.80, कुमार प्रशिक मंगल माटे याला 67.20, कु. प्रणाली संतोष पारधी हिला 65.80,कु. शीतल सुरेश राखडे हिला 65.40 मिळवून यश प्राप्त करून विद्यालयाचा मान वाढविला.शाळेचा एकूण निकाल 82 टक्के लागला.
डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ.पी. आर.मेश्राम साहेब,सचिव वि. पी.मेश्राम साहेब, कोषाध्यक्ष वाय.आर.मेश्राम साहेब, सदस्या सौ.लिना वि. मेश्राम मॅडम व इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एम नगराळे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशात शाळेचे मुखाध्यापक,शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा सहभाग होता.




