Home चंद्रपूर ब्रम्हपुरी तालुक्यात 1 हजार 930 पाल्य प्रवेश घेणार पहिल्या वर्गात अध्यापनात...

ब्रम्हपुरी तालुक्यात 1 हजार 930 पाल्य प्रवेश घेणार पहिल्या वर्गात अध्यापनात E साहित्याचा वापर सेमी इंग्रजी माध्यम 12 शाळांमध्ये – मयुर एच लाडे , गटशिक्षणाधिकारी

168

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी: जूनच्या अखेरीस सर्वत्र शाळेची चाहूल पाल्य आणि पालकामध्ये बघायला मिळते. जी. प. शाळेला प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण होणे गरजेचे असते. सहा वर्षे वरील सर्व पाल्य पहिल्या वर्गात प्रवेश करीत असतात. परंतु कॉन्व्हेन्ट मध्ये विद्यार्थी अडीच – तीन वर्ष पूर्ण झाले की प्रवेश घेतात. ग्रामीण भागातही कॉन्व्हेन्ट कडे कल वाढलेला दिसून येतो. ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली पालक आपल्या पाल्यांना जी. प. शाळेला प्रवेश करीत असतात. सहा वर्षांवरील पाल्य आणि त्यांचे पालक शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत असतात. यावर्षी तालुक्यातील 1,930 विद्यार्थी बसणार पहिलीच्या वर्गात. अशी माहिती ब्रम्हपुरी गटशिक्षणाधिकारी मयुर एच लाडे यांनी दिली. तालुक्यात इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशपात्र असलेल्या मुलांचे गावस्तरावर सर्वेक्षण पूर्ण केले. तसेच प्रवेशप्रक्रिया करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वितरण होणार आहे. तालुक्यात एकूण 1,930 विद्यार्थी पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशपात्र असून आतापर्यंत 1,712 विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप 218 विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया शिल्लक आहे. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांमध्ये 929 मुले तर 783 मुली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या 7 ने अधिक आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 155 शाळा आहेत. यामध्ये खाजगी अनुदानीत प्राथ. – 2, खाजगी अनुदानीत – 24
खाजगी अनु. आश्रम शाळा – 2, विना अनुदानीत – 2
स्वयं अर्थसहाय्य ( कॉन्व्हेट )- 10 आहेत. जी. प. शाळेतील पटसंख्या वाढीसाठी तालुका शिक्षण विभागाकडून गावोगावी उपक्रम राबविण्यात आले व विद्यार्थी पटसंख्या वाढीकडे भर देण्यात आली.

______________________

*जी.प. शाळांच्या पटवाढीकडे लक्ष*

पाल्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमची सुविधा – 12 शाळांमध्ये उपलब्ध करण्यात आली. तसेच उर्वरित शाळांमध्ये प्रयत्नशील. शाळांमध्ये मूल्यमापन व संस्कारक्षम शिक्षणावर भर. आनंददायी शिक्षण
व आजची स्पर्धा बघता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देणे.
भौतीक सुविधांमधे वाढ, अध्यापनात E साहित्याचा वापर तसेच सहशालेय उपक्रमांमधे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग करून शाळा करून घेत असतात.
जिल्हा परिषद शाळांच्या पटवाढीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकभेटी घेणे, मोफत गणवेश, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, दर्जेदार शैक्षणिक साहित्याचा वर्ग अध्यापनात वापर करण्यात येतो.

— मयुर हणमंतराव लाडे , गटशिक्षणाधिकारी, ब्रम्हपुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here