Home महाराष्ट्र बाबूजी आव्हाड महाविद्यालय राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सक्रिय : डॉ. देविदास वायदंडे प्राचार्य...

बाबूजी आव्हाड महाविद्यालय राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सक्रिय : डॉ. देविदास वायदंडे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे यांचा सेवापुर्ती समारंभ संपन्न

114

 

पाथर्डी (प्रतिनिधी) :
येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे हे नियत वयोमानानुसार प्राचार्य पदावरून १८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापुर्ती समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ देविदास वायदंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड होतें तर व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, उपप्राचार्य डॉ बबन चौरे, नवनाथ ढाकणे, संभाजीराव आव्हाड, सरपंच संजय बडे, डॉ शामराव बडे, प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापूरे, डॉ शेषराव पवार, पुरुषोत्तम फुंदे, लक्ष्मणराव खेडकर, शब्दगंध चे सुनील गोसावी, डॉ संजीव लाटे, प्रा. बाळासाहेब सागडे, राजेंद्र दौंड, कैलास दौंड, शाहीर भारत गाडेकर, प्राचार्य अशोक दौंड, डॉ संजय नगरकर, मीनाताई ढाकणे, डॉ राजधर टेमकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.वायदंडे म्हणाले, पारंपारिक शिक्षणानंतर विद्याशाखांमध्ये अमुलाग्र बदल होत असून या बदललेल्या परिस्थितीत सर्वाना बरोबर घेऊन प्राचार्याना काम करावे लागते. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासामध्ये प्राचार्यांचे मोठे योगदान असते. इतर सर्व स्टाफ सुट्टीवर असला तरीही प्राचार्यांना २४ तास काम करावे लागते. २०१३ सालापासून शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रिया ठप्प असल्यामुळे अनेक आव्हाने शिक्षण क्षेत्रासमोर उभी आहेत. १९६६ साली स्थापन झालेले बाबुजी आव्हाड महाविद्यालय राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात अखंड गर्क असलेले महाविद्यालय आहे. १८ वर्ष डॉ ढाकणे यांनी प्राचार्यपद सांभाळताना सर्वाना एकाच धाग्यात गुंफण्याचे काम केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही नवनवीन संकल्पना राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ताणतणाव व्यवस्थापन कसे करायचे हे प्राचार्य डॉ ढाकणे यांच्याकडून शिकावे असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी शाहीर भारत गाडेकर यांनी प्राचार्य डॉ ढाकणे हे विद्यार्थांमध्ये कसे लोकप्रिय होते याविषयीच्या भावना आपल्या गीतातून शब्दबद्ध केल्या तर शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सचिव सुनील गोसावी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ बबन चौरे, सुत्रसंचालन डॉ अशोक कानडे व प्रा मन्सूर शेख तर आभार प्रा. सुरेखा चेमटे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here