Home महाराष्ट्र सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

105

 

कराड: (दि. 30 मे, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड  व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त “स्व. यशवंतरावजी व सौ. वेणूताई चव्हाण: सहजीवनाचा आदर्श” या विषयावर शनिवार, दि. १ जून २०२४ रोजी प्रमुख पाहुणे मा. श्री. बी. एन. कालेकर(माजी प्राचार्य वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. अल्ताफ हुसेन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री. शिवाजी शिक्षण संस्था,कराडचे उच्च शिक्षण मंडळ) हे असणार आहेत. तसेच प्रनुख उपस्थिती म्हणून मा. श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे उच्च शिक्षण मंडळ) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी कराड परिसरातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन वेणूताई चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य मा. प्रा. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here