Home महाराष्ट्र नॅशनल पुरस्कार ते साहित्य भूषण पर्यंत अखिलचा प्रवास.

नॅशनल पुरस्कार ते साहित्य भूषण पर्यंत अखिलचा प्रवास.

147

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील अखिल मेश्राम यांना पलपब संस्था गुजरात तर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांनी सत्कार करण्यात आले आहे.
अखिल मेश्राम यांना नॅशनल एक्सेलन्स पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कारांनी सातारा ( कराड ) येथे 26 मे रोजी सत्कार करण्यात आले आहे तरी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात अखिल मेश्राम यांची चर्चा सुरु आहे. एवढ्या कमी वयात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात , पुस्तका लिहितात , अनेक वृत्तपत्रात अखिल यांचे लेख प्रकाशित होतात.
अखिल सर यांना अनेक जिल्ह्यात मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतात. अखिल सर म्हणतात आयुष्यात अशक्य काहीच नाही.
पुरस्कार दरम्यान अखिल यांनी सांगितले की त्यांना उंच भरारी साठी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने त्यांना बळ मिळते व ते सकारात्मक राहतात. 6 वर्षात कष्ट करून कमी वयात खूप काही करून दाखवीला आणि अनेक गरजू लोकांची मदत करून उच्च पदावर त्यांनी पाठविले आहे. तसेच मोटिवेशनल टिप्स ही पुस्तक यांची महाराष्ट्रात अनेक लोकांना प्रभावित केले असल्यामुळे महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कारांनी सन्मान करण्यात आले आहे..
प्रवास 12 वीत सुरु भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्या पासून ते आज पुण्या सारख्या मोठ्या शहरा पर्यंत न थांबता सुरु आहे. वयाच्या सतराव्या वर्षी अनेक क्षेत्रांचा अनुभव आला आणि इथूनच परिवर्तनाची सुरवात झाली. आत्मविश्वास होताच, जिद्द होतीच, चिकाटी होतीच.याच इच्छा शक्तीने 2017 मध्ये कम्युनिटी अकॅदमी तुमसर येथे सुरु करून व्यक्तिमत्व विकासा बद्दल अनेक विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केलं. बघता बघता 2022 मध्ये MPSC HUB स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मार्गदर्शन प्लॅटफॉर्म सुरु केलं. तसेच अनेक स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे लेखन केलं आणि लिखाण सुरु आहे.तसेच मार्गदर्शन सुरु आहे. सामाजिक गीतांचा सुद्धा लेखन सुरु आहे.
ओळख अशीच बनत नाही कष्ट,जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास आणि सहनशीलता असली पाहिजे.अनेक पुस्तकांचा अथांग वाचन करून एक पुस्तक तयार होतं असते. मोटिवेशनल टिप्स हे फक्त टिप्स नसून योग्य दिशा आणि स्वतः मध्ये बदल घडवणारी पुस्तक आहे.

जिद्दी बना पण ते स्वतः साठी….
चिकाटी ठेवा ते स्वतः साठी…..

विजय मिळवा देशा साठी……
स्वाभिमानी बना देशा साठी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here