Home महाराष्ट्र तथागत भगवान बुद्ध जयंती निमित्त आरोग्य तपासणी महा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद.

तथागत भगवान बुद्ध जयंती निमित्त आरोग्य तपासणी महा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद.

257

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड :- महाकारूनीक तथागत भगवान बुद्ध यांच्यां २५६८ व्या जयंती महोत्सवा निमित्त तथागत नगरवासीयांच्या वतीने डॉ. गुणवंत जगतकर यांच्या संकल्पनेतून महा शिबिराला 23 मे रोजी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दोनशे उपसकांनी तथागत नगरात तपासणी करत औषधाचा लाभ घेतला. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने महा शिबिराला प्रमुख उपस्थितीमध्ये भिक्खु संघ आणि श्रामणेर संघ असतानाच डॉ.आर डी हरभरे,डॉ.अशोक हनवते, डॉ.विलास साबणे यांचीही विशेष उपस्थिती होती. महा शिबिर सुरू होण्यापूर्वी प्रथमता भन्ते मोग्लायन भन्ते आमरशिल यांच्या हस्ते व श्रामणेर संघाच्या वतीने भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद मुख्याधिकारी जयवंत सोनवणे,महावितरण अभियंता नितेश भासारकर यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन झाल्यानंतर आरोग्य शिबीरास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोद्धाचार्य लक्ष्मण व्हावळे यांनी केले. असता सुत्रसंचलन प्रा.दिपक पवळे यांनी करत उपस्थितांचे आभार मेघानंद गोदाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या समारोपात खेळतानाही करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here