Home चंद्रपूर आता एमएसडब्लुची सिईटी महाविद्यालयीन स्तरावर-समाजकार्य पदव्युत्तर प्रवेश झाला सुलभ

आता एमएसडब्लुची सिईटी महाविद्यालयीन स्तरावर-समाजकार्य पदव्युत्तर प्रवेश झाला सुलभ

184

 

चिमुर/प्रतिनिधी :-

समाजकार्य पदव्युत्तर (एम. एस. डब्लु.) प्रवेश प्रक्रिया विद्या परिषदेत झालेल्या निर्णयानुसार आता महाविद्यालयीन स्तरावर होणार असल्याची सुचना गोंडवाना विद्यापीठाच्या पत्र क्र. जा. क्र. गोवि/परिक्षा/वि/१८९५/२०२४ दिनांक १४/०५/२०२४ च्या पत्रानुसार कळविले आहे.

एम.एस.डब्लु. सिईटी परिक्षेबाबत विद्यापीठाने नियोजन केले असुन महाविद्यालयाच्या वेवसाईटवर किंवा महाविद्यालयातच प्रवेश फार्म देणार असुन त्याची परिक्षा ही महाविद्यालयातच होणार आहे. त्याकरिता ५ जुन ते २५ जुन २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु असुन अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना ३५० रूपये व इतर विद्यार्थ्यांना ५०० रूपये नोंदणी शुल्क विद्यापीठाने आकारले आहेत. ७ जुनला प्रवेशपुर्व सामायिक परिक्षा महाविद्यालयात होणार असुन परिक्षेतुन पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना सामायिक परिक्षा पास केल्यानंतर समाजकार्य पदव्युत्तर (एम.एस.डब्लु.) प्रथम वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तरी पदवी परिक्षा पास अथवा अपियर विद्यार्थ्यांनी समाजकार्य पदव्युत्तर (एम.एस.डब्लु.) प्रथम वर्षाला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी महाविद्यालयात येवुन प्रवेश अर्ज सादर करावा असे आवाहन आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरच्या प्राचार्या डॉ. शुभांगी लुंगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here