ब्रहपूरी:- जगदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज सेवासमितीच्या वतीने 11 फेब्रुवारी 2024 ला उपजिल्हा शासकिय रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले .या रक्तदान शिबिराला नागरिकांचा ऊस्फुर्त प्रतीसाद मिळाला सदर शिबिरात 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर शिबिरात शासकिय ब्लड बँक गडचिरोली रक्तपेढी रक्त संकलन करण्याकरीता उपलब्ध होती. सर्व रक्तदात्यांचे खुप- खुप अभिनंदन व आभार तालुक्याचे तालुकाध्यक्ष व त्यांची तालुका कमिटी व सेवा केंद्र कमिटी व आरती कमिटी व सर्व जिल्याच्या कमिटीने व कार्यकरत्यांनी परिश्रम करून शिबिर यशस्वी केले .त्याबद्ल सर्वांचे खुप खुप अभिनंदन अशीच सेवा आपल्या कडून निरंतर घडत राहील अशी स्वामी चरणी प्रार्थना पुढील शिबिर या महिन्यात 17 फेब्रुवारी 2024 पिंपळगाव (भोसले) येथे घेण्यात येत आहे. या सामाजिक कार्यात सहभागी होऊन उपकृत करावे असे आवाहन ब्रम्हपुरी सेवा समिती तर्फे करण्यात येत आहे.




