*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : शनिवार 10 फेब्रुवारी 2024 रोजी पेडणे गोवा या ठिकाणी संपन्न होणाऱ्या चौथ्या फुले शाहू आंबेडकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ शरद गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. डॉ शरद गायकवाड यांनी आजपर्यंत बँकॉक रशिया मास्क मलेशिया भूतान श्रीलंका दुबई या ठिकाणी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय फुले शाहू आंबेडकर साहित्य संमेलनामध्ये आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये अण्णाभाऊ साठे लहुजी साळवे मुक्ता साळवे या महापुरुषांच्या विषयी जागतिक दर्जाची व्याख्याने दिलेली आहेत. अण्णाभाऊ साठे आणि मातंग समाज यावर त्यांनी शिवाजी विद्यापीठात पीएचडी केली असून शंकर भाऊ साठे यांच्या साहित्यावर महाराष्ट्रात सर्वप्रथम विद्यापीठ स्तरावरील एम फिल चे संशोधन त्यांनी 19 97 मध्ये केलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या लहुजी साळवे मातंग समाजाचा अभ्यास आयोगावर तज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले असून सध्या महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती मध्ये तज्ञ सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.




