Home यवतमाळ उमरखेड प्रशासकीय इमारतीचे आ.नामदेव ससाने यांच्याहस्ते भूमिपूजन (ईमारतीवर १४ कोटी ८०...

उमरखेड प्रशासकीय इमारतीचे आ.नामदेव ससाने यांच्याहस्ते भूमिपूजन (ईमारतीवर १४ कोटी ८० लाख खर्च होणार)

183

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा, प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड, दि.९ (फेब्रुवारी) येथे नव्याने मंजूर प्रशासकीय ईमारत बांधकामाचे भूमिपूजन आज आ.नामदेव ससाने यांच्याहस्ते झाले. १४ कोटी ८० लक्ष रुपये खर्च करुन ही सुसज्ज ईमारत बांधण्यात येणार आहे.

उमरखेड महागांव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या विशेष प्रयत्नातून ईमारत मंजूर झाली आहे.

भुमिपूजन कार्यक्रमास आमदार नामदेवराव ससाने यांच्यासह नितीन भुतडा, उपविभागीय अधिकारी सुभाष गाडे, तहसिलदार वैभव पवार, बळवंतराव नाईक, प्रकाश दुधेवार, सुदर्शन रावते, श्रीधर पाटील देवसरकर, भाऊराव चव्हाण, सुरेश काळे, किसनराव वानखेडे, सविताताई पाचकोरे, अल्काताई मुडे, अँड. अस्मिताताई आढावे, पुंडलिक कुबडे, परामानंद पाटील कदम, अतुल खंदारे,श्री.दुधे आदी उपस्थित होते.

नवीन ईमारतीतून नागरिकांना उत्तम दर्जाच्या आणि जलदगतीने सेवा उपलब्ध होतील.येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील उत्साह वाढेल, असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.ससाने म्हणाले.

तसेच ईतर मान्यवरांची देखील यावेळी भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here