Home यवतमाळ मुख्यमंत्रीमाझी शाळा सुंदर शाळा अभियान अ गफुर शाह न प उर्दु...

मुख्यमंत्रीमाझी शाळा सुंदर शाळा अभियान अ गफुर शाह न प उर्दु शाळेची जय्यत तयारी सुरु

142

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड : – (दि. 5 फेब्रुवारी )राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे या साठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर
शाळा’ हे अभियान राबविण्याचे शासनाचे धोरण आहे.

या अंतर्गत नगर परिषद डिजीटल तसेच अनेक पारितोषिक प्राप्त शाळा अ . गफुर शहा उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्र 2 येथे जय्यत तयारी सुरु आहे .

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे हा अभियाना चा उद्देश आहे.

तालुकास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांका च्या शाळेस अनुक्रमे रु. ३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक शासनाकडून मिळणार आहे.

राज्यात शासकीय शाळांची पटसंख्या वेगाने कमी होत असताना केवळ गुणवत्तेच्या जोरावर शाळेची पटसंख्या ४०० पासून ८५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली.

मागील चार वर्ष एसएससी चे निकाल शंभर टक्के . शाळेला आदर्श शाळा पुरस्कार ,विज्ञान प्रदर्शनी मध्ये शाळेला तालुका व जिल्हा स्तरावर क्रमांक मिळाला आहे.

नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सदर शाळा दरवर्षी प्रथम किंवा द्वितीय प्रमाणपत्र धारक आहे . दर रविवारी जिल्ह्यातील विविध विषयाचे तज्ञांना शाळेत आमंत्रित करून विद्यार्थाच्या ज्ञानात भर पडून शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे.

शाळा शिस्तप्रिय असून शाळे बाबत शून्य तक्रारी आहेत. शाळा सुदर, स्वच्छ, संगणक, आधुनिक प्रयोग शाळेने सुसज्ज असुन शाळंचे खोल्याचे आधुनिकीकरण करून अध्यपना मध्ये तंत्रज्ञना चा वापर केला जातो

योजनेची सर्व उदिष्टे नप अ .गफुर शहा शाळा पूर्ण करित असल्याचे निदर्शेनात येते तसेच मुल्यांकन गुण प्राप्त करण्यासाठी ज्या बाबी पूर्ण करणे आवश्यक आहेत त्या साठी शाळेचे मुख्याध्यापक राहत रोशन अन्सारी व त्यांचे सर्व शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत आहेत त्यामुळे या शाळेला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळेल असे शहरात बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here