Home महाराष्ट्र ज्यांच्या समोर झुकतात माना …त्यांनीच बालकांसमोर जोडले हात

ज्यांच्या समोर झुकतात माना …त्यांनीच बालकांसमोर जोडले हात

95

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : मुलं ही देवाघरची फुलं असतात. या फुलांना जपले की त्यांच्या स्वभावातून चांगला सुगंध दरवळतो .छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्री छ खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी सातारा स्पर्धेसाठी आलेल्या बालकांनी भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले पण ज्या ठिकाणी अनेकांच्या माना झुकतात . त्या श्री. छ .खा. उदयनराजे भोसले यांनीच बालकांसमोर हात जोडून त्यांचे स्वागत केल्याने बाल मन भारावून गेले .
साताऱ्यातील जलमंदिर म्हणजे अनेकांचे आश्रयस्थान आहे. देशी- विदेशी अनेक लोक, अधिकारी ,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, व्ही आय पी असे अनेक जण जल मंदिरात भेट घेऊन श्री.. छ खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संवाद साधतात. अभिनेते, नेते, शास्त्रज्ञ व आपापल्या भागात दरारा असलेले असे अनेक भाई सुद्धा तयांच्या चरणांवर लोटांगण घेतात. श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांची मान आराध्यदैवत व युगपुरुष प्रतिमा वगळता कोणा पुढे झुकत नाही. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे साताऱ्यात बाल नाट्य स्पर्धेसाठी आलेल्या चिमुकल्यांच्या समोर त्यांनी दोन हात जोडून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे हे मायाळू रूप पाहून बाल चिमुकल्यांची मन भारावून गेले. मैं खडा तो सबसे बडा… असे फिल्मी डायलॉग राजेबद्दल बोलले जाते. त्या राजांसाठी लहान मुलांचे बाल मनातून सुद्धा राजे… जय हो .. असा जयघोष करतात .
आगामी सातारा लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार म्हणून श्री छ खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. आणि निवडणुकीत पूर्वीच प्रचारातही आघाडी घेतली. याबद्दल कुणाचे दुमत नाही.
त्यांच्या प्रचारासाठी भाजपच नव्हे तर महायुतीतील शिवसेना ,राष्ट्रवादी व घटक पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराज विक्रमी मतांनी निवडून येतील. असे त्यांचे हितचिंतक सुनिल काटकर व अभ्यासू पत्रकार संदीप शिंदे , काका धुमाळ, पंकज चव्हाण, संग्राम बर्गे, विनीत पाटील , बाळासाहेब ननावरे यांनी काही प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here