कराड- पाडळी केसे ग्रामपंचायतच्या वतीने विश्वास बाबुराव मोहिते यांनी राबवलेल्या घर तिथे संविधान उपक्रमाबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरपंच सौ.शैला श्रीनिवास शिल्पी उपसरपंच आनंदा कदम, ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर, सलीम मुजावर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इम्रान मुजावर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हाशम मुजावर माजी सरपंच मोहम्मदअली शेख, ग्रामपंचायत सदस्य नयुम शेख, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदेसर, गणेश कुंभार, सलीम शेख, प्रविण सावंत यांच्यासह ग्रामपंचायती चे आजी-माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, पोलीस पाटील, सह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. आभार मोहम्मद अली शेख यांनी मानले.




