Home गंगाखेड गंगाखेड च्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना मनस्ताप

गंगाखेड च्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना मनस्ताप

40

प्रतिनिधी //अनिल साळवे
गंगाखेड (प्रतिनिधी)
गंगाखेड च्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसल्याने खातेदार संतप्त झाले आहेत,
या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांचे अनुदान वाटप केले जाते.तर तालुक्यातील बहुतांश वयोवृद्ध निराधार. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ पेन्शन ,विधवा महिलांना पेन्शन या योजनेचे शासनाचे अनुदान वाटप केले जाते ,पण या बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून या वयोवृद्ध निराधार व्यक्तींना अतिशय अपमानास्पद वागणूक मिळत आहे,विषेश म्हणजे हे अनुदान सरकारने या लाभधारकांना दिलें आहे तरी या बॅंकेतील कर्मचारी मात्र उपकार केल्यासारखी वागणुक देवुन खातेदारांना अपमानीत करीत आहेत, याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होतं आहे.
याच बॅंकेत सन 2022 चे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान,पिकविमा. पी.एम.किसान योजनेचे अनुदान, व तालुक्यातील ग्रामीण भागातील वयोवृद्ध निराधार व्यक्तींचे अनुदान, वाटप करण्यात येते मात्र सरकारने खास दिवाळीच्या सनासाठी शासनाच्या योजनेचे अनुदान अनेक वयोवृद्ध निराधार वृद्धांना मिळाले नाही त्यामुळे या वयोवृद्ध निराधार लोकांची दिवाळी झालीच नाही, ते अद्याप ही बॅंकेच्या दारात बसुन आहेत.याचे कोणतेच सोयरसुतक बॅंक प्रशासनाला नाही.
तर शेतकर्यांना ही आपल्या हक्काच्या पैशासाठी तिनं तिनं दिवस बॅंकेच्या दारात चकरा माराव्या लागत असल्याने या बॅंकेतील खातेदार संतप्त झाले आहेत.विषेश म्हणजे या बॅंकेने 7410925555 हा फोन नंबर शेतकऱ्यांना आपले बॅलन्स किती आहे हे तपासण्यासाठी टोल फ्री नंबर दिला आहे पण या नंबरवर कोणतीही माहिती मिळत नाही त्यामुळे फक्त बॅंलेस तपासणी करण्यासाठी दोन दिवस जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आमच्या घामाचा व हक्काचा पैसा जर बॅंकेत आमच्या वेळेला मिळतं नसेल तर मग आम्ही या बॅंकेत खाते का ठेवायचे असा प्रश्न शेतकरी बॅंक प्रशासनाला विचारीत आहेत, विषेश म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी विम्याचे,पैसे अथवा इतर अनुदानाचे पैसे नॅशनल बॅंकेत जमा व्हावे या साठी प्रत्येक शेतकऱ्याने नॅशनल बँकेचा खाते नंबर तहसिल कार्यालयात जोडला आहे पण शेतकऱ्यांच्या त्या नॅशनल बॅंकेच्या खात्याच्या ऐवजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात हे अनुदान वर्ग केल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे एक तर बॅंकेला हे झेपत नसेल तर अनुदान वाटप अन्य बॅंकाना वर्ग करावे अन्यथा ठोस यंत्रणा उभी करून खातेदारांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घ्यावी अशी मागणी नागरीकातुन पुढें येतं आहे
कारणं तीन तीन दिवस पैशाच्या विड्रॉल स्लिप भरुन देवून ही पैसे मिळत नाहीत म्हणजे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो आहे ही समस्या कोण सोडणार आहे का..असा प्रश्न खातेदार शेतकरी विचारतोय..
*प्रतिक्रिया*
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवसथापण अत्यंत ढिसाळ असुन या बॅंकेत दलालांचा सुळसुळाट असुन शेतकरी व वयोवृद्ध नागरिकांना स्वतःच्या मालकी हक्काचे बॅंकेतील जमा पैसे उचलण्यासाठी प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे बॅंक ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात पुर्ण अपयशी ठरली आसुन
बॅंकेच्या टोल फ्री क्रमांकावर खात्यांवर जमा झालेल्या रक्कमे विषयी असलीच माहीती मिळतं नाही.पैसे उचलण्यासाठी ची विड्रॉल स्लिप मिळवण्यासाठी खातेदारांना बॅंकेतील कर्मचाऱ्यांकडे गयावया करावी लागत असुन बॅंक कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत अपमानास्पद वागणुक देत असुन याला जबाबदार बॅंकेचे प्रशासन जबाबदार आहे.यावर जिल्हा प्रशासनाकडून कडक उपाययोजना न झाल्यास किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
कॉम्रेड ओंकार पवार
जिल्हा सेक्रेटरी किसान सभा परभणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here