Home चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटन सचिव पदावर डी. के. आरीकर यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटन सचिव पदावर डी. के. आरीकर यांची निवड

51

 

चंद्रपूर -येथिल सामाजिक कार्यकर्ते, झुंझार पत्रकार, बहुजन ललकार या वृत्तपत्राचे संपादक महाराष्ट्र शासनाचे दलित मित्र व आदिवासी सेवक पुरस्कारांनी सन्मानित डी. के. आरीकर यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटन सचिव पदावर प्रदेश अध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी एका पत्राद्वारे नियुक्ती केली आहे.

नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते माजी गृहमंत्री, व आमदार अनिलबाबू देशमुख यांच्या हस्ते नागपूर येथे डी. के. आरीकर यांना देण्यात आले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख प्रामुख्याने उपस्थित होते.

डी. के आरीकर हे पक्ष स्थापने पासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये काम करीत असून एक निष्ठावाण कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. डी. के. आरीकर यांनी पक्षात विविध सेलचे जिल्हा अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या काम केले, त्यात प्रामुख्याने ओबीसी सेल, ग्राहक सेल, कामगार सेल तशेच जिल्हा स्तरावर सुद्धा अनेक पदावर काम केले आहे. आणि म्हणून त्यांच्या पक्षातील कामाचा अनुभव आणि मोलाचे योगदान पाहून डी. के. आरीकर यांना प्रदेश वर संघटन सचिव पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

डी. के. आरीकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटन सचिव या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, मुनाज शेख, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हा अध्यक्ष दीपक जयस्वाल, कार्याध्यक्ष सुधाकर कातकर, महिला अध्यक्ष बेबीताई उईके, ऍड. अंजली साळवे, नंदा शेरकी, बब्बूभाई ईसा, ऍड. वैशाली टोंगे, सुरेश गुळदे पाटील, संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, निपचंद शेरकी, राणी राव, पुरुषोत्तम वाघ, अरुण वासलवार, डॉ. देव कन्नाके, दिनेश एकवणकर, प्रशांत भरतकर, नामदेवराव लढी, मनोहर रासपायले, पूजा शेरकी, महेंद्र शिरोडे, प्रदीप अडकीने, पी. एस. आरीकर, ऍड. निमेश मानकर, सुहास झाडें, सुधाकर रोहनकर, मनोहर जाधव इत्यादी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here