




रोशन मदनकर(उपसंपादक) मो.
88886 28986
ब्रह्मपुरी:- ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक आरमोरी रोड नागेश्वर नगर (रेल्वे फाटक जवळ)ब्रम्हपुरी येथे ब्रम्हलिन वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 55 वी पुण्यतिथी निमित्ताने ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जी प सदस्य चंद्रपूर,नगरपरिषदचे नियोजन सभापती तथा नगरसेवक महेशभाऊ भर्रे, अनंताभाऊ उरकुडे,वासुभाऊ सोदरकर, इजि. राऊत, अविनाश हादगुडे,अनिल उपासे ,संतोष मिसार,पत्रकार गोवर्धन दोनाडकर, रोशन चौधरी, शेषराव सूर्यवंशी,भास्कर उरकुडे,मनोहर सहारे, संभाजी ढोंगे,पांडुरंग राऊत, सुनील मेश्राम, मुखरू भानारकर, प्रभुजी ढोंगे माजी सैनिक,लोमेश प्रधान, विहार मेश्राम,आशिष लांजेवार, बंडू प्रधान, शंकर मानकर, अरूनजी प्रधान, किशोर प्रधान, अशोक प्रधान, अंबरदास दोनाडकर, व नागेश्वर नगर समितीचंद पदाधिकारी तसेच वार्ड वासीय बहुसंख्येने उपस्थित होते.
ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी निमित्त चौकामध्ये तोरण, रंगरंगोटी करून महाराजांना आदरांजली वाहिली. ब्रह्मपुरी शहरातच नव्हे तर अनेक गावागावांमध्ये ब्रम्हलीन वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी व जयंती साजरी करा तसेच ग्रामगीता प्रत्येकाच्या घरी असली पाहिजे आपल्या मुलांना शिक्षणासोबत महापुरुषाचे विचार असले पाहिजे. असे विचार यावेळी प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जी. प. सदस्य चंद्रपूर यांनी मांडले.

