




अमोल जोगदंडे /धनज (उमरखेड)
धनज (उमरखेड) – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा धनज येथे गुरुवार दि. 12 ऑक्टोंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली ही निवड सर्वानुमते करण्यात आली .समितीच्या अध्यक्षपदी हरी यादव वाळके, उपाध्यक्षपदी गजानन सुरेश राठोड, सदस्य म्हणून अनुराधा बाळू व्यवहारे, गंगाबाई जनार्दन ढोबळे, शोभा गजानन गायकवाड, शांता बंडू आमले कीर्ती अशोक झाटे,रुखमाबाई मारोती मोडक, विजय खेतू चव्हाण, राजेश नामदेव झाटे, मोबीनखान रोशन खान पठाण ,अमोल उत्तम जोगदंडे यांची पालक सभेमधून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सो वनिता देवानंद पाचपुते उपसरपंच मुक्ता संजय झाटे, तंटामुक्ती अध्यक्ष अनाजी बोंबले, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन धनवे ,उपाध्यक्ष विष्णू चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य दिलीप वाळके ,दत्तप्रसाद जाधव, देवानंद पाचपुते यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. या सभेला शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश जोशी ,शिक्षकवृंद सुधाकर कवडे ,गजानन देवकते ,विलास सुरोसे ,शिंदे सर ,सोनटक्के मॅडम, देवसरकर सर यांच्या उपस्थितीत सदर समिती गठीत करण्यात आली. यावेळी गावातील पालक वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल जोगदंडे /धनज

