Home महाराष्ट्र सायबर स्टॉकिंगव्दारे तुमचा पाठलाग होतोय !- अॅड. चैतन्य भंडारी

सायबर स्टॉकिंगव्दारे तुमचा पाठलाग होतोय !- अॅड. चैतन्य भंडारी

27

 

 

जगदीश का. काशिकर,
९७६८४२५७५७

 

धुळे: सायबर गुन्हेगार नागरीकांना फसविण्यचे नवनवीन प्रकार शोधत – असतात. त्यात नविन प्रकार म्हणजे सायबर स्टॉकिंग होय. सायबर स्टॉकींग हा आधुनिक काळातील सर्वाधिक चर्चेत असलेला सायबर गुन्हा आहे. सायबर स्टॉकींग व्दारे हे सायबर गुन्हेगार तुमच्यामधून एखादया कोणावर सातत्याने पाळत ठेवतात नाहीतर त्याचा सतत पाठलाग करतात. एखादया व्यक्तीला एकसारखे मॅसेज पाठवणे, ईमेल पाठवणे, तो वापरत असलेल्या चॅटरुममध्ये प्रवेश करणे, त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील सर्व हालचालींवर सातत्याने पाळत ठेवणे असे प्रकार हे सायबर गुन्हेगार करीत असतात. ब-याच वेळेस इंटरनेटच्या दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षिततेची माहिती नसलेल्यांना याचा सामना करावा लागतो. या पैकी बहुतेक प्रकरणात महिला, मुले किंवा मानसिकदृष्टया कमजोर असलेले लोक यांच्या जाळयात अडकतात. यासाठी आपण पुढील काळजी घ्यावी – आपल्या सोशल मिडीया प्रोफाईल्सची गोपनीयता सेटींग्ज तपासा, आपल्याला माहिती असलेले लोकच पोस्ट आणि प्रोफाइल पाहू शकतात याची खात्री करा, आपला पत्ता किंवा फोन नंबर सार्वजनिकपणे पोस्ट करु नका, आपली गोपनीय माहिती शेअर करु नका, आपला पासवर्ड मजबूत ठेवा, अज्ञात, संशयास्पद संदेश किंवा ईमेल आल्यास ते न वाचता डिलीट करा, तसेच आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ टोल फ्री नंबर १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here