




सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : 18वी जिल्हास्तरीय अष्टे डू मर्दानी आखाडा स्पर्धा म्हसवड येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातुन 150ते 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
हस्तकला व शिवकला या खेळ प्रकारामध्ये दहिवडी येथील A1कराटे क्लाबच्या एकूण 12 विद्यार्थ्यानी आपला जलवा दाखवत गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई केली.
यामध्ये सेजल गोंजारी (गोल्ड मेडल), तनिष्का गायकवाड (गोल्ड मेडल), गौरी जाधव (गोल्ड मेडल ) प्राची जाधव ( गोल्ड मेडल),अरवी भिसे (गोल्ड मेडल),स्वरा स्वामी ( सिल्वर मेडल), ईश्वरी स्वामी (ब्रॉज मेडल ),रिया वायदंडे ( सिल्वर मेडल), श्रावणी स्वामी ( ब्राँझ मेडल ), आर्या साखरे (सिल्वर मेडल ), समृद्धी स्वामी ( ब्राँझ मेडल ), समृद्धी भुजबळ( सिल्वर मेडल ) या विद्यार्थ्यांनी हस्तकला प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर शिवकला या प्रकारात या विद्यार्थ्यांने सुवर्णपदक मिळवले.
या सर्व विद्यार्थ्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
या स्पर्धेसाठी नवनाथ भिसे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचे उद्घाटन रयत स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व सातारा जिल्हा अष्टे डू जिल्हाध्यक्ष सागर पवार, यांच्या हस्ते करण्यात आले.तर म्हसवड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी राजकुमार भुजबळ यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले अष्टे डूआखाडा असोसिएशनचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी पवार सर, अष्टे डू चे जिल्हा सातारा उपाध्यक्ष बंडोपंत लोखंडे सर, खजिनदार नवनाथ भिसे,किरण बोराटे सर,दिग्विजय माने, संतोष लांब, मंगेश कळढोणे, यश माने, प्राजक्ता केसरकर, श्रेयश लंगडे, आदित्य पवार, प्रतीक कोळेकर या सर्वांनी स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

