Home यवतमाळ कृषी महाविद्यालय उमरखेड येथील विद्यार्थ्यांनी केले जनावरांच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शन

कृषी महाविद्यालय उमरखेड येथील विद्यार्थ्यांनी केले जनावरांच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शन

41

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 16 सप्टेंबर) लंपी या घातक आजारावर उपचार व पावसाळ्यात जनावरांची काळजी घेण्याचे महत्व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालय उमरखेड येथील कृषिदूत कु. ऋतुजा चव्हाण, साक्षी डुकरे, रश्मी सोरते, ऋतुजा गवळी, आयेशा खानम, भाविका मसराम यांनी पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कृषी विद्यार्थ्यांनी हे जाणून घेऊन आजारावर प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणाबाबत उमरखेड येथे शेतकऱ्यांना व पशुपालकांना मार्गदर्शन केले.

जनावरांना होणारा त्वचारोग, घटसर्प ,खुरपा ,जिवाणूजन्य विषाणूजन्य व लंपी आजार या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लसीकरण मोहीम राबविण्यात आली या मोहिमेला सहायक पशुधन अधिकारी डॉ ज्ञानेश्वर तुकारामराव जवने सर यांनी लसीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here