Home महाराष्ट्र शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सात व आठ ऑक्टोबर ला नगर मध्ये राज्यस्तरीय साहित्य...

शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सात व आठ ऑक्टोबर ला नगर मध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन

23

अहमदनगर – शब्दगंध साहित्यिक परिषदेचे पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन शनिवार दिनांक सात व रविवार दि.आठ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथील गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैया जगताप यांनी दिली.
शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,संस्थापक सुनील गोसावी, वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.भूषण ब-हाटे, नवजीवन प्रतिष्ठान चे राजेंद्र पवार, सुनीलकुमार धस, कार्यवाह सुभाष सोनवणे, शर्मिला गोसावी, बबनराव गिरी, सरोज आल्हाट, खजिंनदर भगवान राऊत, ॲड सुभाष भोर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संमेलनातील साहित्य लोकजागर यात्रा, ग्रंथ प्रदर्शन, शाहिरी जलसा, उद्घाटन,परिसंवाद विषय, चर्चासत्र, कथाकथन,कवी संमेलन, प्रगट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप समारंभ याबाबत चर्चा झाली.
पुढील आठवड्यात १९ सप्टेंबर रोजी दु ११वा.शब्दगंध ची वार्षिक सर्व साधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनात मान्यवर साहित्यिकांसह नवोदितांना मोठ्या संख्येने सामावून घेण्यात येणार असून नवोदितांनी संमेलनासाठी नाव नोंदणी( ९९२१००९७५० ) करावी असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी केले आहे. संमेलनात दोन काव्य संमेलने, दोन परिसंवाद होणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील दोन प्रज्ञावंतांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. सन 2021 व 2022 च्या राज्यस्तरीय वाड:मय पुरस्काराचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
बैठकीचे प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले सूत्रसंचालन सुनील धस यांनी केले तर शेवटी भगवान राऊत यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here