




✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.28ऑगस्ट):-जादूटोणाविरोधी कायदा राज्यव्यापी अभियान संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू असून परभणी येथून निघाल्यानंतर गंगाखेड मध्ये दिनांक 29 ऑगस्ट रोजी खालील विविध ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम होणार असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुंजाजी कांबळे,व प्रकाश शिंगाडे यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे केले आहे त्यामुळे जादूटोणाविरोधी कायदा अभियान कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा.
राज्यव्यापी प्रबोधन अभियानात प्रमुख उपस्थिती मध्येपरभणी जिल्हा प्रबोधन यात्रा राज्यकार्यकारी समिती सदस्य-सातारा प्रशांत पोतदार,जटानिर्मूलन करणाऱ्या कार्यकर्त्या तथा राज्यकार्यकारी समिती सदस्य नंदनी जाधव पुणे,भगवान रणदिवे बुवाबाजी संघर्ष समिती-सांगली,यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून सोमवार २८ ऑगस्ट रोजी परभणी येथे शारदा महाविद्यालय,जुन्या जिल्हापरिषद सभागृहात व सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम नवरचना प्रतिष्ठान परभणी येथे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 ऑगस्ट रोजी मंगळवारी गंगाखेड मध्ये संत जनाबाई महाविद्यालय सकाळी दहा वाजता,पंचायत समिती सभागृह,गंगाखेड महिलांसाठी कार्यक्रम दुपारी साडेबारा नंतर सायंकाळी चार वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय प्रबोधन कार्यक्रम परभणी समारोप होईल.त्यामुळे इच्छुकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रकाश शिंगाडे यांच्याशी संपर्क साधावा.याच दिवशी जादूटोणाविरोधी कायदा अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी रवाना होतील.

