Home चंद्रपूर २७ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन

२७ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन

55

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24ऑगस्ट):-बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटीत आणि असंघटित कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या ट्रेड युनियनचे राज्य स्तरीय अधिवेशन येत्या रविवारी २७ आगस्टला मातोश्री सभागृह, संविधान चौक, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.यात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी सहभागी होऊन आपल्या जिल्ह्यातील केलेल्या कार्याची माहिती देतील.

प्रथम प्रतिनिधी सत्राचे उद्घाटन सकाळी ठीक ११वाजता नागपुर विभागाचे शिक्षक आमदार मा‌‌.सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध मेंदू व मानसिक रोग तज्ञ डॉ.विवेक बांबोळे हे उपस्थित राहतील.दुसरे सत्र हे खुल्या अधिवेशनातील प्रबोधन सत्र दुपारी ठीक २ वाजता सुरू होईल.

या खुल्या सत्रात (१)भारतीय संविधानाची वर्तमान स्थिती व आव्हाने आणि (२)जातीनिहाय जनगणना व जाती अंताचा लढा आणि संविधानातील धोरणे:एक विश्लेषण या दोन विषयांवर नागपूर येथील भदंत धम्मसारथी, बंगलोर येथील सुप्रसिध्द विचारवंत लोकेश नाईक, मुंबई येथील आयकर आयुक्त अरविंद सोनटक्के, यवतमाळ येथील सुप्रसिद्ध रिपब्लिकन विचारवंत बुद्ध धम्मातील क्रांती विज्ञान या पुस्तकाचे लेखक रमेश जीवने तसेच आवाज इंडिया या टी.व्ही.च्यानेलचे संचालक प्रितम बुलकुंडे इत्यादी या प्रबोधन सत्राला मार्गदर्शन करतील.या सत्राच्या अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे हे राहतील. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संविधान प्रेमी जनतेने या अधिवेशनामध्ये उपस्थिती दर्शवून समताधिष्ठित समाज निर्माण करण्याच्या कार्यात सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here