




🔹अण्णाभाऊंचे साहित्य प्रेरणादायी व ऊर्जा देणारे -व्ही.टी.माळी सर [ व्याख्याते ]
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.2ऑगस्ट):- साळवा तालुका धरणगाव येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून व्हि टी माळी सर धरणगाव यांनी सांगितले की अण्णा भाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी कविता, कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि कलापथके सादर करून समाज प्रबोधनात्मक जनजागृती घडवून आणली व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या क्रांतिकार्याची झलक उभ्या जगाला दाखवून दिली.
अण्णाभाऊंचे साहित्य प्रेरणादायी व ऊर्जा देणारे असे प्रतिपादन माळी यांनी केले. यावेळी साळवे इंग्रजी विद्यालयाची विद्यार्थिनी भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रणाली नारखेडेने उत्तम प्रबोधनात्मक भाषण सादर केले. तिचाही सत्कार केला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री एस डी मोरे सर उपस्थित होते. त्यांनी प्रास्ताविकात साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचा जीवन परिचय करून इतिहास सांगितला.
याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोरख थोरात, उपाध्यक्ष विजय अहिरे रवींद्र अहिरे, प्रतिभा अहिरे, रोहिदास अहिरे, मनोज देवरे श्री सपकाळे, नवल चव्हाण, वैभव सपकाळे, चंद्रकांत अहिरे आणि साळव्यातील ग्रामस्त नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय अहिरे यांनी केले.

