




🔸जुगणाळा व चौगान येथील शेतकऱ्यांची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 29 जुलै):–ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान – जुगनाळा रोडवर नविन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असुन सदर बांधकाम चुकीच्या पध्दतीने झाले आहे. त्यामुळे जवळील शेतकऱ्याचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे .त्या नविन पुलाच्या दोन्ही बाजुस मोठमोठया खांडी पडल्याने आमच्या शेतामध्ये पुर्णपणे माती पसरलेली आहे. व सध्या धान पिकाचे रोहणीचे हंगाम सुरू आहे. त्या नविन बांधकामामुळे शेती हंगाम करणे शक्य नाही. त्या पुलीची चौकशी करून योग्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता जुगणाळा-चौगान गावातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन दिले आहे .
सदर पुलाची चौकशी करून त्या पुलाच्या दोन्ही बाजुस सिमेंट कॉकेट वॉलचे बांधकाम करण्यास संबंधित कंत्राटदाराला आदेश देण्यात यावे. जेणेकरून भविष्यात येथील शेतकऱ्यांना फायदेशिर राहील व झालेल्या नुकसानीचा मोबदला येथील शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, विजयभाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्र, तहसिलदार, तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी , कार्यकारी अभियंता सार्व बांधकाम विभाग नागभीड यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना दादाजी तोंडरे,गजानन भुरे, ताराचंद्र मुळे, नंदकिशोर मुळे, कैलास क्षीरसागर, नामदेव ठाकरे ,मधुकर लिचडे ,सुनील ठाकरे ,होमराज बनपूरकर, सुंदरा मुळे ,संजय तोंडरे, गुणाजी तोडरे ,देवाजी सलामे ,प्रकाश क्षीरसागर व जुगणाळा व चौगान गावातील शेतकरी उपस्थित होते.

