Home महाराष्ट्र छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

65

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.26जुलै):-प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा सन्मानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्कार लोकशाहीर, सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक व विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जेष्ठ समाजसेविका, धम्मलिपी प्रशीक्षिका, कवी आणि संपादिका छाया पाटील (मुंबई) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते, डॉ. नंदकुमार गोंधळी (कोल्हापूर) यांना जाहीर झाला असल्याची माहिती प्रागतिक लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. पद्माकर तामगाडगे आणि निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अध्यक्ष अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची पुस्तके असे असून मंगळवार दि. 1 ऑगस्ट, 2023 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ज्येष्ठ लेखक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, माजी आमदार राजीव आवळे, ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि लेखक ॲड. कृष्णा पाटील, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्य सदस्य डॉ. सोमनाथ कदम, संपादिका व धम्म चळवळीच्या अभ्यासिका विजया कांबळे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्रा. टी. के. सरगर, कवी व लेखिका डॉ. शोभा चाळके, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ होणार असून यावेळी तासगाव, जि. सांगलीचे माजी नगराध्यक्ष अमोल (नाना) शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन, साहित्य, विचार आणि आजची प्रस्तुतता या विषयावर जाहीर चर्चाही करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेला प्रागतिक लेखक संघ महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे चंद्रकांत सावंत, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, शेषराव नेवारे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, मोहन मिणचेकर, रंजना सानप, उद्धव पाटील, डॉ. स्वप्निल बुचडे, नामदेव मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here