Home महाराष्ट्र अभंगातून नीतीमूल्ये समाजात रुजविणारे संत सावता महाराज – प्रा.अरुण बुंदेले

अभंगातून नीतीमूल्ये समाजात रुजविणारे संत सावता महाराज – प्रा.अरुण बुंदेले

79

🔸संत सावता महाराजांनी मानवता व समतेची शिकवण दिली- प्रा.श्रीकृष्ण बनसोड

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.18जुलै):-स्थानिक उपेक्षित समाज महासंघ व फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज स्मृतिदिन हिंदू स्मशानभूमी संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रमुख अतिथी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले,अनिल भगत, टी. एफ. दहिवडे, हभप गोविंद फसाटे होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
महासंघाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणातून “संत सावता महाराजांनी मानवता व समतेची शिकवण दिली. अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड इत्यादींवर प्रहार करून नशीब व दैवा ऐवजी श्रमाची उपासना करण्याचा संदेश दिला .”असे मत व्यक्त केले.

प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले यांनी,” सावता महाराजांनी अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य केले. स्वकार्यातून स्वतःच्या मळ्यात देव शोधणारे संत सावता महाराज एक महान संत होत.जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली नीतीमूल्ये त्यांनी अभंगातून समाजमनात रुजविली. फळाची आशा न बाळगता सतत कर्म करणे, हा संदेश अभंगातून आणि प्रत्यक्ष अचरणातून त्यांनी समाजाला दिला.” असे विचार व्यक्त केले.

प्रमुख अतिथी अनिल भगत यांनी ,” सावता महाराजांनी बहुजन समाजाला सतत कर्म करीत राहण्याची निष्काम कर्मयोगाची शिकवण प्रत्यक्ष आचरणातून दिली.”असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन टी. एफ. दहिवाडे व आभार गोविंद फसाटे यांनी मानले.याप्रसंगी सर्वश्री संजय बोरकर, सुधाकरराव सपकाळ, मिलिंद वझरकर, संदीप वझरकर, किशोर शिंदे, अरुण बाळापुरे, गजानन वझरकर, नंदकिशोर तारकर,मुकेश तिवळटकर, निलेश वानखडे, आर. के. वानखडे यांची उपस्थिती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here