




✒️किशोर बावणे(साकोली विशेष प्रतिनिधी)मो:-7350793187
साकोली(दि.15जुलै):- माती बांधकाम असलेल्या गोरगरीबांचे घर पावसाळ्यात कोसळू नये याकरिता भाजयुमोचे तालुका अध्यक्ष दिपक हिवरे यांच्या प्रयत्नातून गरीबांच्या घरावर आवरण म्हणून त्रिपालचे वाटप येथील फ्रिडम युथ फाऊंडेशनतर्फे ( १५ जुलै ) ला प्रभाग १० आमराई येथे करण्यात आले.
शहरातील आमराई येथे मार्कंड वैकुंठ पुरी ८१ हे अत्यंत गरीब असून यांचे घर मातीचे व अत्यंत जीर्ण आहे. पावसाळ्यात केव्हाही हे घर केव्हाही कोसळण्याची दाट शक्यता होती. याकरिता फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांनी दिपक हिवरे यांकडे ही मागणी केली होती. व अश्यांना आवरण म्हणून त्रिपालचे वाटप येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिपक हिवरे यांनी पुढाकार घेतला.
दि. १५ जुलैला आमराई येथे मार्कंड वैकुंठ पुरी यांच्या घरी जाऊन फ्रिडम युथ फाऊंडेशनतर्फे त्यांना त्रिपाल प्रदान करण्यात आली. याप्रसंगी फ्रिडमचे किशोर बावणे, रितीक बडोले, मनिष झिंगरे, निकेश सयाम, स्वामी नेवारे, आशिष गुप्ता, अमर खंडारे, कार्तिक लांजेवार, अश्विन तिडके, समीर सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

