Home महाराष्ट्र प्रश्न कामगारांचा मार्ग तिथे मनसेचा….!!

प्रश्न कामगारांचा मार्ग तिथे मनसेचा….!!

47

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:/९७६८४२५७५७

मुंबई(दि.5जुलै):-आज सोलारिस, जी बी एस या नामांकित असलेल्या कंपनी मधील कामगारांना गेल्या महिन्यात कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक कामावरून कमी केले, त्या सर्व कामगार बंधू भगीनींनी मनसे नेते अविनाश जाधवसाहेब व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे (भाई) यांच्या कडे धाव घेतली.

या सर्व कामगारानां १५ दिवसात त्यांना ०३ महिन्याची सॅलरी मिळवून दिली.

या सर्व कामगारांनी मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करत मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये प्रवेश केला.यावेळी पूर्ण संपूर्ण परिसर सन्मानीय राजसाहेब ठाकरे,मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या घोषणानांनी दणादून गेला…!यावेळी मनकासे अध्यक्ष डॉ. मनोजभाऊ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here