




शांताराम दुनबळे
नाशिक-:येवला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवार दिनांक २७ जुन रोजी महिला शेतकरी दिन हा महिलांना सन्मानित करून साजरा केला.तर पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने येवला तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने महाराष्ट्र मिलेट मिशन मी सूगरण ऑनलाईन पाककला स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना बक्षीसे देण्यात आले.या स्पर्धेत येवला तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यांतील महिलांनी पौष्टिक तृणधान्य पाककृती बनविण्यासाठी सहभाग नोंदवला होता.याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी श्री संजय सुर्यवंशी,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस,श्रीमती सविता विकास वाघमोडे यांना,तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस श्रीमती सीमा दिपक ढोकळे,यांना तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्रीमती साधना प्रशांत सानप यांना प्राप्त झाले.उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच उपस्थित सर्व सहभागी स्पर्धक महिलांना सन्मानित करण्यात आले.अनेक महिलांनी या स्पर्धेत सहभागी होत पौष्टिक तृणधान्य वर्ष प्रचार करण्भायात हातभार लावला बद्दल उपविभागीय कृषी अधिकारी यांनी आभार मानले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मंगेश जंगम येवला तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकरी महिलांना महिला शेतकरी सन्मान दिनानिमित्त संबोधित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक श्रीमती सोनाली कदम यांनी केले.यावेळी श्री सिद्दिकी साहेब मंडळ कृषी अधिकारी येवला,श्री मधुकर वर्पे कृषी पर्यवेक्षक येवला व तालुका कृषी अधिकारी येवला कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहाय्यक संतोष गोसावी यांनी केले.

