Home चंद्रपूर महाकाली नगरीत चोरांचा सुळसुळाट : नागरिक भयभीत

महाकाली नगरीत चोरांचा सुळसुळाट : नागरिक भयभीत

136

चंद्रपूर (प्रतिनिधी)-
शहराला लागून असलेल्या महाकाली नगरी क्र. २ देवाडा येथे अलिकडे रात्रौला सबमर्शिबल मोटार पंप चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. यापूर्वी येथे घरफोडीचे प्रकरण झाले होते.‌त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या भागात गरजू लोक कर्ज काढून आपापली घरे बांधत असून हा भाग विकसित होत असताना दुसरीकडे मात्र भूरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे.त्यामुळे पडोली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिस प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन चोरांचा बंदोबस्त करावा तसेच रात्रीच्या वेळी कडक गस्त वाढवावी,अशी आग्रही मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. निशाताई धोंगडे यांनी एका निवेदनाद्वारे आ. किशोरभाऊ जोरगेवार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here