
नाशिक-:शांताराम दुनबळे
नाशिक-:चांदवड शहरातील नेमिनाथ जैन संस्था या न त्या कारणाने पाच वर्षापासुन नेहमीच चर्चेत आहे.2018 या वर्षी तंत्रनिकेतन प्राचार्य अपात्र प्रकरण,2021 या वर्षी इंग्लिश माध्यम शाळेतील पालकांच्या तक्रारी तसेच चांदवड नगरपरिषद कार्यालयाने कर वसुलीबाबत केलेले मोजमाप,एक माजी मुख्याध्यापिका यांनी राज्य महिला आयोगात दाखल केलेली तक्रार अश्या अनेक कारणांनी नेमीनाथ जैन संस्था जिल्हाभर चर्चेत आहे.
मागील मे महिन्यात 29 मे 2023 रोजी चांदवड नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी विश्वस्त श्री नेमिनाथ जैन संस्था यांना चांदवड नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी नोटीस दिली असून त्यात नमूद केले आहे की चांदवड नगरपरिषद अंतर्गत टाऊन प्लॅनिंग प्लॅन इस्टिमेट, प्लॉट, दिवाबत्ती, पाणी, व्यवस्थापन रस्ते व नियोजित स्थापन होणाऱ्या नागाई कॉलनीमधील ओपन स्पेस नेमिनाथ जैन संस्थेने अतिक्रमण केलेला आहे तो खुला (ओपन स्पेस) करणे बाबत तसेच चांदवड येथील नगर परिषदेच्या पश्चिमेस असलेली लेंडी हट्टी वस्ती येथून नेमीनगर या कॉलनीतून वनीकरणाच्या बाजूने कोंबडवाडी येथे जाणारा पक्का रस्ता अतिक्रमण काढून खुला करून मिळणे बाबत या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त आहे.
त्या अनुषंगाने आपले नेमीनाथ जैन कार्यालयाकडे सदर ओपनस्पेसला घातलेल्या वॉल कंपाउंड बांधकाम परवानगी,मोजणी नकाशा व कागदपत्रे 7 दिवसाचे आत सादर करावे,तसेच लेखी स्वरूपात म्हणणे सादर करावे.दस्तऐवज मुदतीत सादर न केल्यास काहीएक म्हणणे नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते शांताराम घुले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की,लेंडी हट्टी वस्ती, नेमीनगर ते कोंबडवाडी रस्ता या परिसरातील अतिक्रमण काढून तात्काळ नागरिकांच्या वापरासाठी रस्ता खुला करावा.
सदरचा रस्ता तात्काळ खुला करून अतिक्रमित बांधकामे यावर प्रतिबंध स्वरूपाची नियोमोचित कार्यवाही विनाविलंबनाची कार्यवाही न केल्यास परिसरातील जनतेच्या माध्यमातून जन आंदोलन उभे करण्यात येईल व अशा परिस्थितीत कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सबंधित चांदवड नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी असे आवाहन निवेदनाद्वारे शिंदे यांनी दिले आहे
