




चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालय येथे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2023 रोजी ग्रामगीता महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. गुलमोहर, कॅसिया, अमलतास, जामुन आदी झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी सर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम “बीट प्लास्टिक पोल्यूशन” असून आजच्या जीवनात आपण पूर्णपणे प्लास्टिकवर अवलंबून आहोत. आपण प्लास्टिकचा वापर कमी करून प्लास्टिकच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग, पर्यावरणशास्त्र विभाग आणि इको क्लबने वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

