Home महाराष्ट्र १७ जणांचे वैद्यकीय पथक निवृत्तीनाथ पालखीच्या सेवेत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी...

१७ जणांचे वैद्यकीय पथक निवृत्तीनाथ पालखीच्या सेवेत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

38

 

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -: महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सुचना केल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १७ जणांचे वैद्यकीय पथक पालखी सोहळ्यासोबत त्र्यंबकेश्वर येथून रवाना केले आहे. याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी देखील त्र्यंबकेश्वर येथे वैद्यकीय पथकासह वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. है पथक त्र्यंबकेश्वरपासून पंढरपूरपर्यंत तसेच पंढरपूरपासून पालीख सोहळा त्र्यंबकेश्वरपर्यंत रिटर्न येईपर्यंत सोबत असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून दरवर्षी पालखी सोहळ्याच्या आरोग्य सेवांसाठी ४ लाख रुपयांचा निधी आरक्षित केला जातो. त्यातूनच आरोग्य विभागाने वैद्यकीय पथकासोबत औषधसाठाही उपलब्ध करुन दिला आहे.१७ जणांच्या वैद्यकीय पथकामध्ये १ मुख्य आरोग्य अधिकारी, ३ सामुदाय आरोग्य अधिकारी, ३ आरोग्य सहाय्यक (पुरुष) २ महिला आरोग्य सहाय्यक, २ औषधनिर्माता, २ शिपाई, ३ वाहनचालक, ०८ अॅम्ब्युलन्स सोबत १ डॉक्टर असे एकूण १७ जणांचे जणांचा समावेश आहे. सध्या उन्हाचा ताप वाढल्याने वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सातत्याने काळजी घेणे गरजेचे आहे, भरपूर पाणी पिणे, बाहेरचे खाऊ नये अशा खबरदारीच्या सुचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कोरोनाचा काळ संपल्यानंतर पालखी सोहळा उत्साहात सुरु झाला आहे. मात्र सध्या नाशिकचे तापमान ४० ते ४२ डिग्री असतांना पालखीतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वारकऱ्यांमध्ये तरुणांपासून ८० वर्षांच्या आजोबापर्यंत सर्वचजण सामील असतात. अशावेळी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतांना कुणालाही अचानक मेडिकल मिर्जन्सीची मदत लागल्यास डॉक्टरांसह औषधे उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशांनुसार पथक देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली. यंदा ३ रुग्णवाहीका वारकऱ्यांच्या दिमतीला असणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा वारीसाठी पुरेपुर काळजी घेतली आहे. देवशयनी अर्थातच आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त राज्यभरातून पंढरपुर येथे वारकऱ्यांच्या दिंड्या येत असतात. विविध जिल्हे, तालुके यांच्या दिंड्यांचे प्रस्थान होण्याचे वेळापत्रक वेगवेगळे असते. यामध्ये प्रमुख असलेली त्र्यंबकेश्वर येथिल संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी नाशिकहून निघते. यंदा हि दिंडी शुक्रवार (दि. २) त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झाली आहे. यामध्ये जिल्हाभरातून वारकरी सहभागी झालेले असतात. जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन निधीमधून ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here