Home महाराष्ट्र आरोपीला फाशी तर पीडित कुटुंबाना आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्यावी. भालेराव...

आरोपीला फाशी तर पीडित कुटुंबाना आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्यावी. भालेराव हत्याकांड प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मुख्यमंत्र्यांना मागणी.

36

 

मुंबई दि (प्रतिनिधी) भीमसैनिक अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणात आरोपींना फाशी ची शिक्षा होऊन पीडित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी तसेच शासकीय सेवेत सामावून घ्यावी असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथरावं जी शिंदे यांना केलेल्या निवेदनात डॉ. माकणीकर असे म्हणाले की,
बोंढार हवेली ता. जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणावर आपण जातीने लक्ष द्यावे, फास्ट ट्रॅक न्यायलयात प्रकरण नेवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

तसेच पीडित कुटुंबाला मदतीचा हाथ म्हणून तत्काल सहाय्यता निधी मिळवून द्यावा आणी कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
होऊ घातलेली जातीयता मोडीत काढण्यासाठी असलेल्या कायद्यांचे तंतोतंत पालन करुन अश्या वृत्ती प्रवृत्तीना ठेचून काढावे. असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

आठवडाभरात पीडित कुटुंबांना आर्थिक मदत नाही मिळाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशाराही पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here