Home महाराष्ट्र नाशिक शहरात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये राडा शिंदे गट कार्यालयासमोर राऊतांच्या समर्थनार्थ...

नाशिक शहरात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये राडा शिंदे गट कार्यालयासमोर राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी नाशिक शांताराम दुनबळे

47

 

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक -:शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन सुरू असताना याच सुमारास एका व्यक्तीने शिवसेना कार्यालयासमोरच संजय राऊत यांच्या बाजूने घोषणाबाजी केली. यावरून शिवसेना कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला धक्काबुक्की करत गोंधळ घातला. यावेळी ठाकरे गट आणिशिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री दिसून आली. मात्र, मध्यस्थी करत वाद पोलिस व कार्यकर्तानी सोडवला.
खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून ते त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेले होते. अशातच संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीवरून राजकीय वातावरण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आंदोलन सुरू असून, नाशिकमध्येही आंदोलन करण्यात आले. याच सुमारास शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या मायको सर्कल परिसरातून खा. राऊतांचा ताफा त्र्यंबककडे रवाना झाला. यावेळी एका व्यक्तीने मध्यवर्ती कार्यालयासमोरच राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. हे पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला धक्काबुक्की करत बाहेर काढले. पोलिसांनी मध्यस्थी करत या व्यक्तीला बाजूला नेले. घोषणाबाजी करणारा व्यक्ती कोण होता, याबाबत ूमाहिती मिळू शकली नाही. सदर व्यक्ती संजय राऊत यांचा ताफा जात असताना शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर उभा राहून ‘संजय राऊत अंगार है, बाकी सब , भंगार है’, अशा घोषणाबाजी करत होता. याचवेळी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्तेदेखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळे पोलीसदेखील तैनात होते. मात्र, या कार्यकर्त्याने घोषणाबाजी चालूच ठेवल्यामुळे शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीदेखील संजय राऊत विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. लागलीच पोलिसांनी मध्यस्थी करत सदर व्यक्तीला पोलीस व्हॅनमधून बाजूला नेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here