Home यवतमाळ ग्राम पंचायत देवसरी येथे नारी शक्तीचा गौरव

ग्राम पंचायत देवसरी येथे नारी शक्तीचा गौरव

65

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 1 जून) तालुक्यातील देवसारी येथे ग्रामपंचायत ची ग्रामसभा आयोजित केली होती. तसेच
ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेचे पूजन व हार सरपंच सौ.मिनाक्षी चंद्रमणी सावतकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.

ग्रामसभेच्या प्रारंभी ग्रामपंचायत देवसरीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 च्या पुरस्कार प्राप्त महिलांच्या नावाची घोषणा व त्यांच्या कार्याचे वाचन सचिव संजय अंबोरे यांनी केली.

देवसरी येथे उत्कृष्ट सामाजिक क्षेत्र,महिला व बालविकास क्षेत्र ,कोवीड-19 अशा उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार आशा आरोग्य कार्यकर्ती सुमया अमजद खान पठाण आणि करुणा जगदीश गिरी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ग्रामपंचायत देवसरीच्या सरपंच सौ. मिनाक्षी चंद्रमणी सावतकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी देवसरी गावातील ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने महिला मंडळ आणि ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here